Ad will apear here
Next
कडेगावमधील कन्या महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान
मतदार नोंदणी अभियानात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी विजय काळम-पाटीलकडेगाव (सातारा) : ‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि ही लोकशाही बळकट करण्याचे काम मतदार करत असतात. मतदानाचा हक्क हा एक पवित्र अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे,’ असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी केले. भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या शासनाच्या मतदार नोंदणी अभियानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
‘सर्वांनी मतदार नोंदणी करून, हे अभियान यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे,’ असे आवाहन त्यांनी केले. 

मतदानाचा हक्क किती महत्त्वाचा आहे याची जाणीव महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुलक्षणा कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना करून दिली. ‘महाविद्यालयामध्ये मतदार नोंदणी व मतदान जागृतीविषयी नेहमीच कार्यक्रम आयोजित केले जातात,’ असे सांगून महाविद्यालयाच्या वतीने हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे वचन त्यांनी दिले. 

‘मतदार नोंदणी अभियान व मतदान जागृती’ या विषयावर महाविद्यालयाने निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला सांगलीचे उपजिल्हाधिकारी मिनार मुल्ला, कडेगाव तालुक्याच्या तहसीलदार अर्चना थेटे, कडेगाव तालुक्याचे युवा नेते डॉ. जिनेध कदम, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. भरत पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन उपप्राचार्य प्रा. मधुकर खोत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रंजना चव्हाण यांनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZHFBE
Similar Posts
वांगी निवासी आश्रमशाळेमध्ये रक्षाबंधन कडेगांव (जि. सांगली) : भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने   रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपल्या पालकांपासून दूर राहून निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
कडेगावमधील कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची पुण्यातील कंपनीत निवड भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थिनींसाठी, ११ जून रोजी नोकरभरती शिबिर आयोजित करण्यात आले होते. पुणे येथील ‘प्रोथॉम इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ या कंपनीत, निवड झालेल्या ८० विद्यार्थिनींमधील पहिली अठरा मुलींची बॅच एक जुलैपासून पुणे येथे कंपनीत रुजू झाली
कृष्णा कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण रेठरे बुद्रुक (सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कराडचे उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला कराड तालुका कृषी अधिकारी दत्तत्रय खरात, वाळवा तालुका उपविभागीय
‘जयवंतराव भोसले म्हणजे एक कुशल नेतृत्व’ शिवनगर (ता. कराड, जि. सातारा) : ‘दूरदृष्टी असणाऱ्या जयवंतराव भोसले यांनी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलीला डॉक्टर होता आले,’ असे उद्गार कविभूषण डॉ. जयश्री श्रेणिक पाटील यांनी काढले. सहकारमहर्षी जयवंतराव भोसले उर्फ अप्पासाहेब यांच्या चतुर्थ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language